आपण नुकतेच २०१६ मधे प्रवेश केलाय. नवीन वर्षाच्या शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कुणी व्हाट्सअँप वर स्वतःचे मेसेज तयार करतंय तर कुणी आपल्याकडे आलेल्या आणि त्यातल्यात्यात चांगले असलेले मेसेज फॉरवर्ड करतायत. वर्षभरात चालणाऱ्या सणसमारंभात अजून एकाची भर कधी पडली हे आपल्यालाच आठवत नाही. आणि आपण त्या सोहळ्यात सगळ्यांबरोबर ओढले जाऊन त्या सोहाळामय केंव्हा होतो तेही लक्षात येत नाही. बस शाळेत वरील वर्गात प्रवेश करताना जसं मोहरून जात होतो तसं नेमकं काहीतरी होत असतं. तसं बघायला गेलं तर ३१ डिसेंबर आणि १ जानेवारीत काहीच फरक नसतो पण तरी आपण तो सोहळा उत्साहात पार पाडतो.
नवीन वर्षांचे संकल्प होतात. काही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे संकल्प करतात तर काही जुनं विसरून नवीन स्वप्ने बघायला लागतात. संकल्प करताना त्यावर शाळेतील मास्तर किंवा बाईंच्या करड्या नजरेची धार नसते. आणि इथेच सगळं गणित बिघडतं. कुणी छोटे छोटे संकल्प करतं तर कुणी अगदी आयुष्य बदलून टाकण्याचा निश्चय करतात. खरंतर वर्ष समाप्तीला यावर विचार करण्याची गरज ज्याने खरंच मनापासून निग्रह केला त्यालाच वाटते. अन्यथा बाकीचे करतात म्हणून संकल्प केला पाहिजे, अशा पद्धतीनेच करतात.
मी सुद्धा दुसऱ्यावर्गात मोडणारा प्राणी. खुपवेळा प्रयत्न करून सुद्धा एखादं दुसरा आठवडा त्या मागे लागलेलो असा आरंभशूर. तिसऱ्या चौथ्या आठवड्यातच पूर्ण विसरून सुद्धा गेलेलो. अगदी जिम ला महिन्याचे पैसे भरून दोन दिवसच गेलो आणि एकदा पैसे भरून गेलोच नाही. सायकल घेतली. मोजून दोन दिवस हौसेने चालवली. तिसऱ्या दिवशी मांड्या दुखण्याचं कारण घेऊन बंद. ती सायकल आता धूळ खात पडलीय. डायऱ्या मधील जानेवारीच्या ३१ पर्यंतची पाने सुद्धा कधी भरली नाहीत. रोज लिहिणार तरी काय? आजूबाजूला नवीन काही घडतंय यावर लक्ष ठेवावं लागतं म्हणजे तशी दृष्टी ठेवावी लागते आणि कान सतत उघडे ठेवावे लागतात याची कल्पनाच कुणी दिली नव्हती किंवा असं काहीतरी करावं म्हणजे तरी लिहिण्यासारखं सापडेल याचं सुद्धा भान आलं नाही. मग रोज रोज लिहिणार तरी काय? कपाळ?
आता तर वर्षभरात केंव्हाही संकल्प होतात आणि ते पूर्णत्वात जातातही! कसंही करून पूर्ण करायचंच याच्यामागे मी लागतो.
माझा चौथा ब्लॉग वाचल्यानंतर, आमच्या ऑफिसचे एच आर, केदार सरांनी सहज बोलता बोलता म्हणाले की नवीन वर्षांचा सूर्योदय बघायचाय तोही तुमच्या फोटोग्राफ मधे. पहिल्यांदाच अशी विचारणा माझ्यापर्यंत पोचवली होती. म्हटलं वा! नक्की पूर्ण करू. यातून माझ्या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या. पहिलं म्हणजे, केदार सरांची अगदी लहानशी गोष्ट पूर्ण केल्याचा आनंद आणि दुसरं म्हणजे वर्षांची सुरुवातही छान होणार. त्यांना रिक्वेस्ट केली की ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला मला हाफ डे लिव्ह द्या. पण त्यांनी ती रिक्वेस्ट नम्रपणे नाकारली. म्हणाले की ३१ डिसेंबर चा मावळणारा सूर्य बघण्यापेक्षा एक जानेवारीचा सूर्योदय बघण्यात आनंद मिळेल. म्हटलं ते हि ठीक आहे. पण माझ्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसली की काहीही झालं तरी ३१ चा मावळणारा आणि १ ला उगवणारा सूर्याचा फोटो नक्की काढायचा. कसा? माहीत नाही.
३० तारखेला माझी साईट व्हिजिट होती. त्या ऑफिसचं काम नवव्या मजल्यावर आहे. पहिले दोन मजले पार्किंग साठी राखीव आहेत म्हणजे ते ऑफिस अकराव्या मजल्यावर आहे. संध्याकाळी तिकडे जाताना, पश्चिमेकडे थोडे जमा झालेले ढग आणि सूर्य मावळायला आलेला दिसला. त्या ऑफिस साईटच्या बाल्कनीतून सुंदर फ्रेम मिळेल याची खात्री झाली. मग काय! अगदी गाडीवरून शहराच्या रस्त्यावर हळुवार चालवणारा मी, सुसाट सुटलो. आणि पोचलो सुद्धा. कितीही घाईत असलो तरी सिग्नल मात्र तोडत नाही. किंवा अगदी झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करत नाही. खरंतर कुणाच्यातरी पुढे जाऊन उभे राहण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करण्याने काहीही फरक पडत नाही किंवा आपण काही फार वेगळं करत नाही. अशा लोकांना सुशिक्षित तर मी मानतच नाही. गाडी सुसाट नेणे सुद्धा काही योग्य नसतेच पण मोकळ्या रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त वेग ठेवणे काही चुकीचं असेल असं मला तरी वाटत नाही. एरवी मी बाकीच्यांना रस्त्यावर पुढे जाऊन देतो, पण त्या दिवशी मी बाकीच्यांना मागे टाकून जात होतो.
पोचलो एकदाचं. लगेच बाल्कनीत धाव घेतली पण एक दोन मिनिट उशीर झालेलाच. सूर्य मावळला होता पण विचार केलेली सुंदर फ्रेम अजूनही होती. तसं त्या ढगांच्या आडून सूर्य दिसलाच नसता. माझ्यासाठी थांबलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून पाच मिनिटांची वेळ मागून घेतली खरी पण कॅमेरा घरात. मोबाईल वर फोटो काढणे भाग होतं. आधी सर्व परिसर नजरेखालून घातला. फ्रेम सिलेक्ट केली. मी काही नवीन कॅमेराचे ऍप डाउनलोड केलेत. त्यात एच डी आर नावाच्या ऍप मधे फोटो काढले.
दोन तीनच. तेवढेच पुरेसे होते. मोबाइलला झूम लेन्स नसतात मग कितीही फोटो काढले तरी फारसा फरक येत नाहीत. फार वेळ घालवणंही शक्य नव्हतं. विचार केला, ३१ ला हाफ डे ची सुट्टी मिळणारच नाही तर इथेच येऊन फोटो काढावेत. दोन्ही गोष्टी साध्य होतील.
३१ डिसेंबरला सकाळी उठलो तेंव्हा लक्षात ठेवलं की कॅमेराची बॅग घेऊन जायची आहे. पण गडबडीत विसरलोच. ऑफिसमधे पोचल्यावर लक्षात आलं. एकूण काय, ३१ डिसेंबरचा सूर्यास्त पुन्हा मोबाईल मधेच टिपावा लागणार. थोडा मूड गेलाच होता. त्यात भर म्हणून दुपार पासून शिंकांनी पाठलाग सुरु केला. आठवडयापासून थोडी सर्दीची वार्ता मिळालीच होती. ती आली. सकाळ पासूनचा उत्साह सुर्यास्ताअगोदर कुठेतरी मावळला. संध्याकाळी शिंकांच्या मुळे कुठेही जायच्या मनःस्थितीत मी नव्हतोच. सूर्य माझी वाटही बघणार नव्हता. तो मावळायच्या वेळीच मावळला आणि अंधार पडल्यावर मी सात वाजता ऑफिस मधून बाहेर पडलो. सरळ घर गाठलं. लवकर झोपून लवकर उठायचं होतं. किमान वर्षाच्या सुरवातीला तरी फोटोग्राफी करायचीच होती. रात्री झोपलोही लवकर. काहीही औषध घेतलं नाही. कारण त्यामुळे गुंगी येऊन उशिरा उठाण्याचं कारण नको होतं.
पहाटे नाक चोंदल्यामुळे साडेचारालाच जाग आली. कालनिर्णय च्या ऍप मधे सुर्योदयाची वेळ बघितली. सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी सूर्योदय होता. अजून खूप उशीर आहे म्हणून पुन्हा झोपायचा निष्फळ प्रयत्न करत तसाच पडून राहिलो. सकाळी पाच अडतीस चा शनिवार रविवार साठीचा गजर झाला. पाच अडतीसच का? पाच तीस, पाच पस्तीस किंवा पाच चाळीस का नाही? विशाल सर ( विशाल नाईक, आमच्या ऑफिस मधील सिनियर इंटिरियर डिझायनर) यांनी मागील ब्लॉग मध्ये वाचून, विचारलेला प्रश्न मला आठवला. त्याचं कारण तसं काहीच नाही. चार पाच मिनिटं डोळे मिटून पडता यावं आणि बरोब्बर पावणे पाचला उठायचंच म्हणून कदाचित असा गजर लावताना मी विचार केला असू शकेल. मलाच आत्ता आठवत नाही. गजर वाजून थकला आणि अर्ध्या तासाने शांत झाला. मी उठलोच. नाक नको म्हणत होतं पण मी उठलोच. पाणी गरम करून वाफ घेतली. थोडं बरं वाटलं. काल पळून गेलेला उत्साह परत आला. गुढगेस्नान उरकली. वेळ न दवडता कपडे चढवली. थंडी वाजतेय म्हणून जॅकेट घातलं. कदाचित मलाच थंडी वाजत असावी. तसा मी फारसा लांब जाणारच नव्हतो. डी एस के विश्व हे पुण्याच्या पश्चिमेच्या एका टेकडीवर डी एस के नीं वसवलेलं एक छोटं गाव. इथे सन-राईज आणि सन-सेट असे दोन पॉइंट्स आहेत. अशा या रम्य आणि निसर्गमय दुनियेत मी नुकताच राहायला आलोय. या सन-राईज पॉईंट वर मी जाणार होतो. इथून यापूर्वी फोटो काढलेत सुद्धा. पण हिवाळ्यात नाही. शक्य झालं तर मी पुढे भटकायला जाणार होतो म्हणून हेल्मेट गाडी सहित तिथे गेलो. माझ्याआधी कुणी उठून फोटो काढायला एक जानेवारीला येईल असं वाटलं नव्हतं. पण एक तीस पस्तिशीतली स्त्री फोटो शूट करत होती. अजून सुर्योदयाची वेळ झालेली नव्हती. सात बारा होऊन गेलेले पण दोन तीन मिनिटांत सूर्य त्याचं दर्शन देणारच होता. मंद हवा सुटलेली. कानाला गार लागत होतं. नाक ओढणं चालूच. पण समोरच दृश्य ते सर्व विसरायला लावणारं होतं. मी कॅमेरा बॅगेतून काढला आणि शूटिंग सुरु केलं. एक फोटो काढला तेवढ्यात कानावर नाजूक आवाज आला. "सर, मी मघाच पासून प्रयत्न करतेय, ऑटो मोड वर जे कलर्स दिसतात ते मॅन्युअल मोड मधे येत नाहीयेत. तुम्ही ISO किती ठेवता?" त्या बाईंनी विचारलं. मी," एक मिनिट" इतकंच. आणि पुन्हा दोन तीन फोटो काढून सेटिंग योग्य असल्याची खात्री केली व त्यांना त्याच्या कॅमेराबद्दल विचारलं. त्यांच्याकडेही तोच कॅमेरा होता. मग मी त्यांना ISO 100 च ठेवतो पण बाकीचे सेटिंग काय असतात ते त्यांना दाखवले. खरंतर जितक्या सेटिंग्ज त्यांनी पाहिल्या तितक्या कमीच होत्या. अजून बऱ्याच सेटिंग्ज असतात त्या सहज लक्षात येत नाहीत. त्याची माहिती कॅमेराशी खेळत असतानाच समजतात.
आणि मी फोटो शूट मधे व्यस्त झालो. दोन तीन मिनिटात अजून काही लोकं आली. म्हणून कदाचित त्या बाईंनी पुन्हा मला काही विचारलं नाही. किंवा मला डिस्टर्ब करावासा वाटला नसेल. पण मी इतरांकडे लक्ष न देता शूटिंग सुरूच ठेवलं. डोंगरापल्याडून उगवणारा सूर्य ही तोच होता जो मी सिंहगडासोबत टिपला होता. इथे निराळेपण आजूबाजूच्या परिसरात आणि वातावरणात होता. तिथे विरळ धुकं तर इथे डोंगराखाली दाट धुकं. तिथे सिंहगडाच्या पायथ्याला झाडी आणि छोटं टुमदार गाव आणि इथे डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोचलेलं शहरी काँक्रिटचं जंगल.
सिंहगडाची उंची जास्त त्यामुळे जास्त प्रखर झालेला तो सूर्य या ठिकाणी खुज्या डोंगरापलीकडून येताना थोडा मवाळच वाटला. मोजून शंभर निरनिराळे फोटो काढून मगच थांबलो. तोपर्यंत त्या बाई आणि इतर लोकं निघून गेले होते. समाधानी होतो. सव्वा आठ वाजलेले. चहा प्यावासा वाटला. जवळचेच हॉटेल गाठलं. चहा पिल्यावर भुकेची जाणीव झाली. या फोटोग्राफी मुळे ही एक चांगली सवय लागलीये. सकाळी भूक लागते व मस्त नास्ता देखील होतो. इडली सांबारावर आडवा हात मारला. आणि सकाळचा उत्साह पुन्हा गायब झाला. घरी जाऊन पडावं वाटलं.
घरी येताना डी एस के च्या छोट्या घाटात दहा बारा फोटो काढले व परतलो.
आधी फोटो लॅपटॉप मधे अपलोड केले. सहा सात चांगले फोटो निवडून डेव्हलप केले. त्यातील एका फोटोवर मोबाईल मधील पिक्स आर्ट ऍप मधे Happy New Year चं टेक्स्ट टाकलं आणि आधी केदार सरांना व्हाट्सअप्प वर पाठवलं.
मग बाकीच्यांना आणि इतर ग्रुपला पाठवले. पुन्हा बाकीच्या पाच फोटोचं कोलाज तयार करून सगळ्यांना पाठवलं. तोवर साडे अकरा झाले. ऑफिसला हाफ डे ची सुट्टी असल्यामुळे इतकं करू शकलो होतो. अजून ऑफिसला वेळ होता. आधी डॉक्टराना गाठलं आणि मग ऑफिसला इच्छा नसताना रवाना झालो.
नवीन वर्षांचे संकल्प होतात. काही त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याचे संकल्प करतात तर काही जुनं विसरून नवीन स्वप्ने बघायला लागतात. संकल्प करताना त्यावर शाळेतील मास्तर किंवा बाईंच्या करड्या नजरेची धार नसते. आणि इथेच सगळं गणित बिघडतं. कुणी छोटे छोटे संकल्प करतं तर कुणी अगदी आयुष्य बदलून टाकण्याचा निश्चय करतात. खरंतर वर्ष समाप्तीला यावर विचार करण्याची गरज ज्याने खरंच मनापासून निग्रह केला त्यालाच वाटते. अन्यथा बाकीचे करतात म्हणून संकल्प केला पाहिजे, अशा पद्धतीनेच करतात.
मी सुद्धा दुसऱ्यावर्गात मोडणारा प्राणी. खुपवेळा प्रयत्न करून सुद्धा एखादं दुसरा आठवडा त्या मागे लागलेलो असा आरंभशूर. तिसऱ्या चौथ्या आठवड्यातच पूर्ण विसरून सुद्धा गेलेलो. अगदी जिम ला महिन्याचे पैसे भरून दोन दिवसच गेलो आणि एकदा पैसे भरून गेलोच नाही. सायकल घेतली. मोजून दोन दिवस हौसेने चालवली. तिसऱ्या दिवशी मांड्या दुखण्याचं कारण घेऊन बंद. ती सायकल आता धूळ खात पडलीय. डायऱ्या मधील जानेवारीच्या ३१ पर्यंतची पाने सुद्धा कधी भरली नाहीत. रोज लिहिणार तरी काय? आजूबाजूला नवीन काही घडतंय यावर लक्ष ठेवावं लागतं म्हणजे तशी दृष्टी ठेवावी लागते आणि कान सतत उघडे ठेवावे लागतात याची कल्पनाच कुणी दिली नव्हती किंवा असं काहीतरी करावं म्हणजे तरी लिहिण्यासारखं सापडेल याचं सुद्धा भान आलं नाही. मग रोज रोज लिहिणार तरी काय? कपाळ?
आता तर वर्षभरात केंव्हाही संकल्प होतात आणि ते पूर्णत्वात जातातही! कसंही करून पूर्ण करायचंच याच्यामागे मी लागतो.
माझा चौथा ब्लॉग वाचल्यानंतर, आमच्या ऑफिसचे एच आर, केदार सरांनी सहज बोलता बोलता म्हणाले की नवीन वर्षांचा सूर्योदय बघायचाय तोही तुमच्या फोटोग्राफ मधे. पहिल्यांदाच अशी विचारणा माझ्यापर्यंत पोचवली होती. म्हटलं वा! नक्की पूर्ण करू. यातून माझ्या दोन्ही गोष्टी साध्य होणार होत्या. पहिलं म्हणजे, केदार सरांची अगदी लहानशी गोष्ट पूर्ण केल्याचा आनंद आणि दुसरं म्हणजे वर्षांची सुरुवातही छान होणार. त्यांना रिक्वेस्ट केली की ३१ डिसेंबरला आणि १ जानेवारीला मला हाफ डे लिव्ह द्या. पण त्यांनी ती रिक्वेस्ट नम्रपणे नाकारली. म्हणाले की ३१ डिसेंबर चा मावळणारा सूर्य बघण्यापेक्षा एक जानेवारीचा सूर्योदय बघण्यात आनंद मिळेल. म्हटलं ते हि ठीक आहे. पण माझ्या डोक्यात एक गोष्ट पक्की बसली की काहीही झालं तरी ३१ चा मावळणारा आणि १ ला उगवणारा सूर्याचा फोटो नक्की काढायचा. कसा? माहीत नाही.
३० तारखेला माझी साईट व्हिजिट होती. त्या ऑफिसचं काम नवव्या मजल्यावर आहे. पहिले दोन मजले पार्किंग साठी राखीव आहेत म्हणजे ते ऑफिस अकराव्या मजल्यावर आहे. संध्याकाळी तिकडे जाताना, पश्चिमेकडे थोडे जमा झालेले ढग आणि सूर्य मावळायला आलेला दिसला. त्या ऑफिस साईटच्या बाल्कनीतून सुंदर फ्रेम मिळेल याची खात्री झाली. मग काय! अगदी गाडीवरून शहराच्या रस्त्यावर हळुवार चालवणारा मी, सुसाट सुटलो. आणि पोचलो सुद्धा. कितीही घाईत असलो तरी सिग्नल मात्र तोडत नाही. किंवा अगदी झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करत नाही. खरंतर कुणाच्यातरी पुढे जाऊन उभे राहण्यासाठी झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करण्याने काहीही फरक पडत नाही किंवा आपण काही फार वेगळं करत नाही. अशा लोकांना सुशिक्षित तर मी मानतच नाही. गाडी सुसाट नेणे सुद्धा काही योग्य नसतेच पण मोकळ्या रस्त्यावर नेहमीपेक्षा जास्त वेग ठेवणे काही चुकीचं असेल असं मला तरी वाटत नाही. एरवी मी बाकीच्यांना रस्त्यावर पुढे जाऊन देतो, पण त्या दिवशी मी बाकीच्यांना मागे टाकून जात होतो.
पोचलो एकदाचं. लगेच बाल्कनीत धाव घेतली पण एक दोन मिनिट उशीर झालेलाच. सूर्य मावळला होता पण विचार केलेली सुंदर फ्रेम अजूनही होती. तसं त्या ढगांच्या आडून सूर्य दिसलाच नसता. माझ्यासाठी थांबलेल्या कॉन्ट्रॅक्टर लोकांकडून पाच मिनिटांची वेळ मागून घेतली खरी पण कॅमेरा घरात. मोबाईल वर फोटो काढणे भाग होतं. आधी सर्व परिसर नजरेखालून घातला. फ्रेम सिलेक्ट केली. मी काही नवीन कॅमेराचे ऍप डाउनलोड केलेत. त्यात एच डी आर नावाच्या ऍप मधे फोटो काढले.
३१ डिसेंबरला सकाळी उठलो तेंव्हा लक्षात ठेवलं की कॅमेराची बॅग घेऊन जायची आहे. पण गडबडीत विसरलोच. ऑफिसमधे पोचल्यावर लक्षात आलं. एकूण काय, ३१ डिसेंबरचा सूर्यास्त पुन्हा मोबाईल मधेच टिपावा लागणार. थोडा मूड गेलाच होता. त्यात भर म्हणून दुपार पासून शिंकांनी पाठलाग सुरु केला. आठवडयापासून थोडी सर्दीची वार्ता मिळालीच होती. ती आली. सकाळ पासूनचा उत्साह सुर्यास्ताअगोदर कुठेतरी मावळला. संध्याकाळी शिंकांच्या मुळे कुठेही जायच्या मनःस्थितीत मी नव्हतोच. सूर्य माझी वाटही बघणार नव्हता. तो मावळायच्या वेळीच मावळला आणि अंधार पडल्यावर मी सात वाजता ऑफिस मधून बाहेर पडलो. सरळ घर गाठलं. लवकर झोपून लवकर उठायचं होतं. किमान वर्षाच्या सुरवातीला तरी फोटोग्राफी करायचीच होती. रात्री झोपलोही लवकर. काहीही औषध घेतलं नाही. कारण त्यामुळे गुंगी येऊन उशिरा उठाण्याचं कारण नको होतं.
पहाटे नाक चोंदल्यामुळे साडेचारालाच जाग आली. कालनिर्णय च्या ऍप मधे सुर्योदयाची वेळ बघितली. सकाळी सात वाजून बारा मिनिटांनी सूर्योदय होता. अजून खूप उशीर आहे म्हणून पुन्हा झोपायचा निष्फळ प्रयत्न करत तसाच पडून राहिलो. सकाळी पाच अडतीस चा शनिवार रविवार साठीचा गजर झाला. पाच अडतीसच का? पाच तीस, पाच पस्तीस किंवा पाच चाळीस का नाही? विशाल सर ( विशाल नाईक, आमच्या ऑफिस मधील सिनियर इंटिरियर डिझायनर) यांनी मागील ब्लॉग मध्ये वाचून, विचारलेला प्रश्न मला आठवला. त्याचं कारण तसं काहीच नाही. चार पाच मिनिटं डोळे मिटून पडता यावं आणि बरोब्बर पावणे पाचला उठायचंच म्हणून कदाचित असा गजर लावताना मी विचार केला असू शकेल. मलाच आत्ता आठवत नाही. गजर वाजून थकला आणि अर्ध्या तासाने शांत झाला. मी उठलोच. नाक नको म्हणत होतं पण मी उठलोच. पाणी गरम करून वाफ घेतली. थोडं बरं वाटलं. काल पळून गेलेला उत्साह परत आला. गुढगेस्नान उरकली. वेळ न दवडता कपडे चढवली. थंडी वाजतेय म्हणून जॅकेट घातलं. कदाचित मलाच थंडी वाजत असावी. तसा मी फारसा लांब जाणारच नव्हतो. डी एस के विश्व हे पुण्याच्या पश्चिमेच्या एका टेकडीवर डी एस के नीं वसवलेलं एक छोटं गाव. इथे सन-राईज आणि सन-सेट असे दोन पॉइंट्स आहेत. अशा या रम्य आणि निसर्गमय दुनियेत मी नुकताच राहायला आलोय. या सन-राईज पॉईंट वर मी जाणार होतो. इथून यापूर्वी फोटो काढलेत सुद्धा. पण हिवाळ्यात नाही. शक्य झालं तर मी पुढे भटकायला जाणार होतो म्हणून हेल्मेट गाडी सहित तिथे गेलो. माझ्याआधी कुणी उठून फोटो काढायला एक जानेवारीला येईल असं वाटलं नव्हतं. पण एक तीस पस्तिशीतली स्त्री फोटो शूट करत होती. अजून सुर्योदयाची वेळ झालेली नव्हती. सात बारा होऊन गेलेले पण दोन तीन मिनिटांत सूर्य त्याचं दर्शन देणारच होता. मंद हवा सुटलेली. कानाला गार लागत होतं. नाक ओढणं चालूच. पण समोरच दृश्य ते सर्व विसरायला लावणारं होतं. मी कॅमेरा बॅगेतून काढला आणि शूटिंग सुरु केलं. एक फोटो काढला तेवढ्यात कानावर नाजूक आवाज आला. "सर, मी मघाच पासून प्रयत्न करतेय, ऑटो मोड वर जे कलर्स दिसतात ते मॅन्युअल मोड मधे येत नाहीयेत. तुम्ही ISO किती ठेवता?" त्या बाईंनी विचारलं. मी," एक मिनिट" इतकंच. आणि पुन्हा दोन तीन फोटो काढून सेटिंग योग्य असल्याची खात्री केली व त्यांना त्याच्या कॅमेराबद्दल विचारलं. त्यांच्याकडेही तोच कॅमेरा होता. मग मी त्यांना ISO 100 च ठेवतो पण बाकीचे सेटिंग काय असतात ते त्यांना दाखवले. खरंतर जितक्या सेटिंग्ज त्यांनी पाहिल्या तितक्या कमीच होत्या. अजून बऱ्याच सेटिंग्ज असतात त्या सहज लक्षात येत नाहीत. त्याची माहिती कॅमेराशी खेळत असतानाच समजतात.
आणि मी फोटो शूट मधे व्यस्त झालो. दोन तीन मिनिटात अजून काही लोकं आली. म्हणून कदाचित त्या बाईंनी पुन्हा मला काही विचारलं नाही. किंवा मला डिस्टर्ब करावासा वाटला नसेल. पण मी इतरांकडे लक्ष न देता शूटिंग सुरूच ठेवलं. डोंगरापल्याडून उगवणारा सूर्य ही तोच होता जो मी सिंहगडासोबत टिपला होता. इथे निराळेपण आजूबाजूच्या परिसरात आणि वातावरणात होता. तिथे विरळ धुकं तर इथे डोंगराखाली दाट धुकं. तिथे सिंहगडाच्या पायथ्याला झाडी आणि छोटं टुमदार गाव आणि इथे डोंगराच्या पायथ्यापर्यंत पोचलेलं शहरी काँक्रिटचं जंगल.
आधी फोटो लॅपटॉप मधे अपलोड केले. सहा सात चांगले फोटो निवडून डेव्हलप केले. त्यातील एका फोटोवर मोबाईल मधील पिक्स आर्ट ऍप मधे Happy New Year चं टेक्स्ट टाकलं आणि आधी केदार सरांना व्हाट्सअप्प वर पाठवलं.

Nice one vivek sir
ReplyDeleteThank you. ☺
DeleteSundar!!!
ReplyDelete