बघताबघता शनिवार (१९ डिसेंबर २०१५) आला सुद्धा. आठवडा कसा संपला कळालं नाही. शनिवार-रविवारची अशी भटकंती केल्यावर full energetic आठवडा जातो. कामं वेळच्यावेळी पारही पडतात. कुठेही दमछाक होत नाही. रविवारचा प्लॅन तर वीर डॅम वर घालवायचा असं ग्रुप वर ठरलं. पण शनिवारचं काय? हा आशूचा प्रश्न. तसा तो सगळ्यांसाठीच. सत्याने काही रिप्लाय दिलाच नाही. धनंजयला कॉलेज मध्ये लेक्चर द्यायला जायचं होतं. मी कुठेही जायला तयार होतो पण अट अशी की छान लॅण्डस्केप फोटो काढायला मिळायला पाहिजेत. बाकीचे नेहमीसारखे गायब. ठरलं, पुन्हा पाबे-वेल्हे रस्त्यावरची भटकंती. आशू तयार कारण, त्याला माहिती होतं की लॅण्डस्केप आणि बर्ड फोटोग्राफी हे दोन्ही त्या रस्त्यावर होऊ शकतं. निघण्याची वेळ पहाटे सहा वाजता. पहाट मुद्दाम म्हणतोय कारण या दिवसात सकाळी सहाला पूर्ण अंधारच असतो. अगदी पूर्वेला सुद्धा, दिवस अजून तरी उजडायला तासभर अवकाश असतोच, मध्यरात्री इतका काळोखही असतो.
रात्री उशिराच झोपलो. आवर्जून पाचचा गजर लावला. यावेळी मात्र AM च आहे याची खात्री केली. उशिरा झोपूनसुद्धा पहाटे मी चक्क चार पन्नास ला उठून बसलो. इतकी एनर्जी कुठून आली कोण जाणे. झटपट आवरलं. आवरत असताना कधीतरी आशूचा मेसेज आला, की तो घरातून बाहेर पडलाय म्हणून. वीस मिनिटात सिंहगड रोड ला येतो म्हणून. मी सव्वा सहाला घरून बाहेर पडलो व ठरलेल्या ठिकाणी पोचलो. आशुची वाट बघत उभा होतो. तिथेच इतक्या सकाळी कुणाचा तरी पिक अप कॉल घेण्यासाठी पण पत्ता सापडत नाही व कुणाला तरी विचारावं म्हणून एक कॅब वाला थांबलेला. मला विचारलं पण मीच या परिसरात नवीन. तो फोन लावायचा प्रयत्न करतोय पण तो देखील लागत नव्हता. बिचाऱ्याच तोंड पडलेलं. त्याने त्याच्या सुपरवाईजर ला फोन करून कल्पना दिली. एकदाचा त्या गिऱ्हाईकाचा फोन आला. त्यात अजून गंमत. फोन वर त्या बाईंना पत्ता नीट सांगता येइना. सर्व्हे नंबर सांगत होती. बहुदा ती अगदीच नवीन होती. ती हिंदी इंग्लिश बोलणारी आणि ड्राइवर मराठी. दोघांचं एकमेकांना कळेना. मला फोन दिला पण मला तीनही भाषा समजत असून सुद्धा तिचं बोलणं मात्र कळत नव्हतं. आता सर्व्हे नंबर वरून तिला शोधायचं कसं? मग तीच म्हणाली की कुणाला तरी पुन्हा व्यवस्थित पत्ता विचारून फोन करते. मी सुस्कारा सोडला आणि ड्राइवरला फोन परत केला. तितक्यात आशू आलाच. त्याने लांबूनच इशारा केला तसा मी लगेच निघालो.
खूप उशीर झालेला. आशू वीस मिनिटात येतो म्हणाला खरा! पण ४५ मिनिटे घेतली. पूर्वेकडे गुलाबी रंगाच्या छटा दिसू लागल्या. वाटलं की सूर्योदय कदाचित टिपायला पुन्हा जावं लागेल. विचार आला की आता जर नाही टिपायला मिळला तर कुणाचीही वाट न पाहाता आपण एकटेच जाऊ. खरंतर सोबत असणं केंव्हाही चांगलं. पण असा उशीर होणार असेल तर एकटा जीव सदाशिव. गाडी सुसाट सोडली. रस्त्यावर गर्दी तशी फारशी नव्हती. आशू कदाचित खूप मागे पडला असावा किंवा थांबला असावा. गाडीच्या आरशात तो दिसत नव्हता. पण आता मी त्याच्यासाठी नक्कीच थांबणार नव्हतो. सुसाट निघालो. गाव आलं की हळुवार न्यायचो. पहिला घाट लागला तसं आठवलं की त्या हॉटेलचं नाव बघावं, जे मी न बघताच, मागच्यावेळी तिथे जाऊन पोटपूजा केली होती. "समर्थ". आता ते बंद होतं. कदाचित तिथे कुणी राहात नसावेत. घाट पार करताकरता मागच्या भटकंतीत न पाहिलेल्या गोष्टी आता दिसत होत्या. जंगल संपलं. पुढे काही अंतरावरील तो सिंहगडाच्या पायथ्याचा गाव आणि गुलाबी रंगात रंगवलेलं ते मंदिर नजरेत पुन्हा एकदा भरलं. खूप जुनं ओळखीचं ठिकाण दिसावं आणि आनंद व्हावा असंच वाटलं. थांबलो.
अजून सुर्योदयाला उशीर होता. पुन्हा एकदा सगळा परिसर डोळ्यात साठवला. सिंहगडाच्या त्या किनाऱ्याच्या खाली दरीतील ते विरळ निळसर धुकं आणि वर गुलाबी-भगव्या रंगात रंगलेलं ते आकाश, तो झाडांत लपलेला गाव. तो मंदिराचा गुलाबी कळस आणि ओढ्याच्या पात्रावरून हळुवार निघालेली ती बगळ्यांची माळ. सगळंच कसं सुंदर. कॅमेरा अजून बॅगेतून बाहेर आला नव्हता. थंडीमुळे बोटं आखडून गेली होती. हातात कॅमेरा धरता येईल असं वाटेना म्हणून हातावर हात घासून गरम केले. पण बगळ्यांच्या माळेसोबतचा फोटो काढताच आला नाही.
कॅमेरा बाहेर काढला व एक दोन फोटो काढून चेक केलं व पुन्हा सेटिंग्स बदलले. फोन वाजला. आशू होता, म्हणाला की गाडीत पेट्रोल भरायला थांबला होता. त्याला माझं व्हाट्सअप वरून लोकेशन कळवलं. आणि पुन्हा फोटो काढायला सुरु केलं. सूर्य कुठे उगवणार याची कल्पना आली. कॅमेराचं सेटिंग्ज योग्य करून सूर्याचं स्वागत करायला तयार झालो. पुन्हा आशूचा फोन आला. त्याला नेमकं कोणत्या रोडने यायचं कळत नव्हतं. रस्त्याच्या मधे झाड आहे का त्यानं विचारलं. म्हटलं त्याच रोड ने पुढे ये मी रस्त्यावरच उभा आहे. आणि खरंच रस्त्याच्या कडेला उभं राहूनच फोटो काढत होतो. कॅमेरा बाहेर आल्यापासून एकही बगळा तिथून गेला नाही. सूर्याची सोनेरी कडा दिसू लागली आणि क्षणाक्षणाला तो वर वर येऊ लागला.
पूर्ण वर आला तेंव्हा असं वाटलं की सिंहगड एका हाताने त्याला वर ढकलतोय. कॅमेराचं शटर सतत वर खाली होत होतं. लेन्स ची नळी पुढेमागे करत वेगवेगळी फ्रेम्स टिपत होतो. मागच्या टेकडीवर थोड्या उंचीवरून अजून छान फ्रेम मिळेल असं वाटलं आणि खरंच तिथून छान फोटो आले. सकाळचं लवकर उठून इकडे फास्ट गाडी चालवत येणं सार्थकी लागलं. सूर्य तोच नेहमीचा. त्याचं सकाळी उगवणं नेहमीच मनाला भुरळ घालतं, मग ते हिवाळ्यात असो किंवा इतर कोणत्याही ऋतूत असो. आणि सिंहगडही तोच. शांतपणे बसलेला. थंडीत धुक्याची शाल ओढून घेणारा, पावसात हिरवा रेनकोट चढवून बसणारा तर उन्हाळ्यात उघडाबंब होऊन वारं घेत असणारा. पण आजचा सिंहगड मात्र वेगळाच भासत होता. सुर्यनारायणासोबतचा त्याचा फोटो त्या दोघांनाही काही वेगळेपण देऊन गेला. खुश होतो. हा महिनाच खुषीचा असावा बहुतेक.
आशू आलाच होता. तो सुद्धा सूर्योदयाचे फोटो काढण्यात मग्न झालेला. आम्ही त्या पंधरा वीस मिनिटात वीस शब्द देखील बोललो नाही. कॅमराचं शटर दमल्यावर आम्ही त्या टेकडीवर चढाई केली आणि पक्षी शोधायला लागलो. पण काहीच सापडलं नाही तसं आम्ही पुढे निघालो. पण लगेचच थांबलो पण. एका झाडावर काही कबुतर येऊन बसले. जवळ गेल्यावर आम्ही एकसुरात ओरडलो...सत्याSSS... कारणच तसं होतं. सत्या ज्या कबुतरांच्या मागे तीन वर्षांपासून लागला होता ते पिवळ्या पायांच्या हिरव्या कबुतरांचा (Yellow Footed Green Pigeon) थवाच आमच्या समोर होता आणि सत्याने आजची ट्रिप चुकवली.
दोन तीनच मिनिटे तो कळप त्या झाडावर विसावला आणि आमची चाहूल लागताच टेकडीच्या दिशेने निघून गेला. आम्ही दोघे अजून खुश झालो. आजचा दिवस खरंच न्यारा होईल असं वाटलं. हळूहळू पुढे जात होतो. मधेच आशू थांबला आणि मला म्हणाला," तुमच्या उजवीकडे बघा. Indian Roller त्या तारेवर बसलाय." वा! सुंदर. मला बरेचवेळा वाटलं होतं की कधीतरी हा पक्षी बघायला मिळाला पाहिजे.
Indian Roller म्हणजे चास किंवा निळकंठ पक्षी. हा थोडाफार किंगफिशर सारखा रंगीबेरंगी दिसतो. एक दोन फोटो काढले. तो लांबच होता म्हणून जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याआधीच तो कुठेतरी निघून गेला. फार काही चांगला फोटो काढता आला नाही पण समाधान वाटलं.
आम्ही तिथेच अजून एका पक्षाच्या मागे लागलो. तो तिथेच इकडे तिकडे फिरत होता. आम्हालाही पळवत होता. पण तो त्या जागेच्या फार लांबही जात नव्हता. त्याला कॅमेरा बंद करताना माझं लक्ष आशुकडे गेलं. तो गाडीवरून उतरून तसंच हेल्मेट घालून फोटो काढत होता. त्याचा त्या अवतारात फोटो काढणं मला जरा गंमतशीर वाटलं. ऐसे पोज में एक तो फोटो बनता है यार!
आम्ही पुढे निघालो. मागच्यावेळी याच ठिकाणाहून परत गेलो होतो. पुढे घाट होता आणि त्याच्यापलीकडे पाबे आणि वेल्हे गावं होती. रस्त्याच्या कडेला एक छोटी टपरी दिसली. किमान चहा मिळतो का बघावं म्हणून आम्ही थांबलो आणि मस्त कांदाभजी खाऊन तृप्त होऊन बाहेर पडलो. आशू स्वस्थ बसलाच नव्हता. त्याचं इकडे तिकडे पक्षी शोधण्यात जास्त लक्ष. अरे तो बघ! आणि हा! असं म्हणत त्याने मला चारपाच पक्षी दाखवले. नावं सुद्धा. पण माझ्या लक्षात राहणं तसं कठीणच. त्या पक्षांचे रंग बघताना मात्र हरकून जात होतो. किती विविधता आहे त्यांच्यात. पूर्वी सगळ्याच चिमण्या बगळ्यांसारखे दिसणारे ते पक्षी आता नवनवीन रूप घेऊन येतायत असं वाटत होतं. एखाद्या पक्षाचं नाव माहिती नसलं की पुस्तकात त्याचं नाव शोधणं आणि तसाच अगदी दिसला तर नेमका कोणता हे सुद्धा शोधणं. नर कोणता आणि मादी कोणती? काय फरक असतात? अरे बापरे! हे तर माझ्या नक्की डोक्यावरून जातं पण इंटरेस्टिंग आहे सगळं. लँडस्केप फोटोग्राफी करताकरता या बर्ड फोटोग्राफीकडे मी हळूहळू ओढला जातोय ते सत्या, आशू, विरेश, योगेश आणि पंकज मुळे. नावं लक्षात ठेवलंच पाहिजे असं नाही. पुस्तकं मदतीला असतीलच. त्यातून काही वेगळे पक्षी दिसले तर? अजून तरी तसं माझ्याबाबतीत काही घडलेलं नाही.
तो बऱ्यापैकी मोठा असणारा पाबे घाट चढून डोंगराच्या वर आलो. डोंगराच्या माथ्यावर असणाऱ्या रस्त्याकडेच्या एका टपरीच्या बाजूला गाड्या उभ्या करून डोळ्याचं पारणं फिटवणारी निसर्गाची किमया डोळ्यात साठवून घेण्याचा दुबळा प्रयत्न सुरु केला. त्या डोंगराच्या एकाबाजूला दूरवर पहुडलेला सिंहगड आणि दुसऱ्याबाजूला तोरणा आणि राजगड आम्हाला साद घालतायत असंच वाटत होतं. चहाची चव चाखताचाखता निसर्ग न्याहाळणं माझ्यासाठी नवीन होतं. चहा संपला तरी तो परिसर काही डोळ्यात मावत नाही. ते काही क्षण मी कॅमेराला विसरून गेलो. स्वच्छ आणि ताजी हवा आत भरून घेताना असं वाटलं की थोडीफार बॅगेत भरून घ्यावी आणि घरी घेऊन जावी. मोकळं आकाश, ते उंच डोंगर, दुपारचं ऊन असून सुद्धा ते दिसणारं खोऱ्यातील निळसर धुकं, न बोचणारं ऊन, गावातली दिसणारी कौलारू घरं, काही ठिकाणची गर्द झाडी, काही हिरवीगार शेतं आणि डोंगरांवरील पिवळं धमक रान. निसर्ग म्हणजे मोठा चित्रकारच आहे. या गोष्टी घडवताना त्याने किती मेहनत घेतली असेल कोण जाणे. आपण मात्र त्याची विल्हेवाट लावत चाललोय याची कुठेतरी खंत वाटते.
आम्ही चहाचे पैसे देऊन त्या डोंगरावरील आणखी उंच माथ्यावर असणाऱ्या झाडाकडे कूच केली. जाताना एका उंबराच्या झाडाखाली शंभू महादेवाचं छोटं मंदिर नजरेस पडलं. छोटा दिवा मिनमिनत होता. नुकतीच त्याची पूजा त्या टपरीच्या मालकाने केली असावी. फोटो काढण्यासाठी आजूबाजूची प्लास्टिकच्या पिशव्या पाकिटं गोळा करून एका बाजूला ठेवली. देवपूजा करायला इथे खालच्या गावातली लोकं येतात. मंदिर साफ करतात पण पूजेचं साहित्य मात्र इथेच आजूबाजूला टाकून जातात. कुणाला काहीही सांगण्याची मनःस्थिती माझी नाहीच. भिडस्त स्वभाव नडतो.
आम्ही तो डोंगर चढत होतो. डोंगराच्या कड्यावरून एकदा तरी जावं असं वाटणारा मी खरंच एक स्वप्न पूर्ण करत होतो. दोन्ही बाजूला दरी. दरीत दोन्ही बाजूला गर्द झाडी जशी की त्या कड्याला आधारच देत आहेत. कमरेपर्यंत वाढलेलं आणि सुकलेलं गवताचं रान. पायवाट तयार करण्यासाठी खणलेल्या चरीतून आम्ही वाट काढत पुढे सरकत होतो. असं रानावनात भटकण्याची हौस अशीच कधीतरी पूर्ण होते तेंव्हा ती अनुभवावीच. वेळ काढून जायला हवं. निसर्गाचं देणं आपण लागतोच. ते शंभर टक्के परत फेड करता येणं आपल्याला शक्य नाही पण नक्कीच आपला काही वेळ तरी निसर्गाबरोबर घालवायला हवा. म्हणजे त्याची किंमत तरी आपल्याला कळेल.
त्या उंच माथ्यावरील झाडाजवळ पोचलो. घामाघूम झालो होतो. छातीची जोरदार धडधड सुरु होती. पण त्या स्वच्छ हवेमुळे त्रास नक्कीच होत नव्हता. आपण सर्वात उंच ठिकाणी पोचलोय असंच वाटत होतं. तिन्ही गड इथून दिसतायत.
दोन्ही बाजूचे घाटही. दोन्ही बाजूची छोटी गावं. आणि लांब पर्यंत धुक्याचं साम्राज्य. कॅमेराच्या फ्रेममध्ये त्या निसर्गाची ही भव्य फ्रेम बसतच नाही. आम्ही काही क्षण तिथेच उन्हात बसलो. लांबवर जाणारी ती डोंगराची रांग आम्हाला अजून पुढे या असंच खुणावत होती पण आमच्यात तेवढं मानसिक आणि शारीरिक बळ नव्हतंच.
आम्ही खाली उतरून त्या टपरीवर परतलो. आणि आधी ताक मग झुणका भाकर कांदा, असा गरमागरम मेनुवर ताव मारला.
तिथेच थोडावेळ सावलीला गप्पा मारत कॅमेरातील फोटोवर नजर मारत बसलो. जमिनीवर टाकलेल्या ब्लँकेटवर आम्ही असे आडवेतिडवे बसलेलो बघून येणारे जाणारे आमच्याकडे बघत जात होते. एका गाडीतून दोन सत्तर पंचाहत्तरीतील काका आले आणि आमच्या शेजारील बाकावर बसले. मी थोडा बाजूला झालो आणि त्यांना बसायला जागा करून दिली. पण त्यांनी नम्रपणे सांगितलं की खाली बसता येत नाही. मग आमची विचारपूस केली गेली. आम्ही काढलेले फोटो दाखवले. ते दोघेच या वयात फिरायला बाहेर पडतात. म्हणाले, पुण्यात राहतो म्हणून आजूबाजूच्या परिसराची ओळख व्हावी म्हणून फिरतायत. पण मला ते फारसं पटलं नाही. कदाचित असेल ही खरं. त्यांना त्यांच्या तरुणपणात काही कारणांनी फिरता नसेल आलं म्हणून आता हौस भागवून घेत असतील. ते दोघे निघाले तसं आम्हीही त्या दोघांचा आणि त्या रम्य परिसराचा निरोप घेतला व परतीचा मार्ग पकडला.
परतताना हळूहळूच गाडी चालवत होतो. न जाणो आणखी काही पक्षी बघायला मिळतील! उतरताना सिंहगडाकडे लक्ष गेलं.
एक वाट चुकलेला ढग सिंहगडाशी जवळीकता करू पाहत होता. पुढे जाताना मागेएकदा वळून पाहिलं. लक्षात आलं की तो ढग एकटाच नव्हता. अजून पाहुणे मंडळी येत होती.
पुन्हा त्याच टेकडीजवळ पोचलो आणि आशूने थांबवलं. म्हणाला त्या टेकडीवर काहीतरी उतरताना त्याने पाहिलं. त्या टेकडीच्या माथ्यावर गेलो पण माळरानाशिवाय काहीच नव्हतं. उन्हं उतरतीला लागलेली. त्यांनी पिवळट रंग परिधान केलेला. दूरवरील झाडातून त्यांचा धुक्यांबरोबर लापाछपीचा खेळ रंगात आलेला. उंच वाढलेल्या त्या सोनेरी गवतातून आशू रोमँटिक मूड मधे फिरत होता.
असा एखादा फोटो हवाच म्हणून दोन तीन पोज मधे त्याने फोटो काढून घेतलेच. मी मात्र थोडा निशब्द होतो. दिवस सार्थकी लागल्याची भावना मनात भरून राहिलेली. टेकडी उतरून घरी परत जाणं भाग होतं. सूर्य अजून बराच वर होता म्हणून न थांबता परत जाण्याचा आमचा निर्णय. त्यात आशुचं काहीतरी काम होतं म्हणून सूर्यास्तापर्यंत थांबणं शक्य नव्हतं. यानंतर मात्र आम्ही जरा सुसाट निघालो. आणि सकाळी भेटलेल्या ठिकाणी थांबलो व उद्या म्हणजे रविवारी सकाळी पुन्हा भेटू असं ठरवून निरोप घेतला.
रात्री उशिराच झोपलो. आवर्जून पाचचा गजर लावला. यावेळी मात्र AM च आहे याची खात्री केली. उशिरा झोपूनसुद्धा पहाटे मी चक्क चार पन्नास ला उठून बसलो. इतकी एनर्जी कुठून आली कोण जाणे. झटपट आवरलं. आवरत असताना कधीतरी आशूचा मेसेज आला, की तो घरातून बाहेर पडलाय म्हणून. वीस मिनिटात सिंहगड रोड ला येतो म्हणून. मी सव्वा सहाला घरून बाहेर पडलो व ठरलेल्या ठिकाणी पोचलो. आशुची वाट बघत उभा होतो. तिथेच इतक्या सकाळी कुणाचा तरी पिक अप कॉल घेण्यासाठी पण पत्ता सापडत नाही व कुणाला तरी विचारावं म्हणून एक कॅब वाला थांबलेला. मला विचारलं पण मीच या परिसरात नवीन. तो फोन लावायचा प्रयत्न करतोय पण तो देखील लागत नव्हता. बिचाऱ्याच तोंड पडलेलं. त्याने त्याच्या सुपरवाईजर ला फोन करून कल्पना दिली. एकदाचा त्या गिऱ्हाईकाचा फोन आला. त्यात अजून गंमत. फोन वर त्या बाईंना पत्ता नीट सांगता येइना. सर्व्हे नंबर सांगत होती. बहुदा ती अगदीच नवीन होती. ती हिंदी इंग्लिश बोलणारी आणि ड्राइवर मराठी. दोघांचं एकमेकांना कळेना. मला फोन दिला पण मला तीनही भाषा समजत असून सुद्धा तिचं बोलणं मात्र कळत नव्हतं. आता सर्व्हे नंबर वरून तिला शोधायचं कसं? मग तीच म्हणाली की कुणाला तरी पुन्हा व्यवस्थित पत्ता विचारून फोन करते. मी सुस्कारा सोडला आणि ड्राइवरला फोन परत केला. तितक्यात आशू आलाच. त्याने लांबूनच इशारा केला तसा मी लगेच निघालो.
खूप उशीर झालेला. आशू वीस मिनिटात येतो म्हणाला खरा! पण ४५ मिनिटे घेतली. पूर्वेकडे गुलाबी रंगाच्या छटा दिसू लागल्या. वाटलं की सूर्योदय कदाचित टिपायला पुन्हा जावं लागेल. विचार आला की आता जर नाही टिपायला मिळला तर कुणाचीही वाट न पाहाता आपण एकटेच जाऊ. खरंतर सोबत असणं केंव्हाही चांगलं. पण असा उशीर होणार असेल तर एकटा जीव सदाशिव. गाडी सुसाट सोडली. रस्त्यावर गर्दी तशी फारशी नव्हती. आशू कदाचित खूप मागे पडला असावा किंवा थांबला असावा. गाडीच्या आरशात तो दिसत नव्हता. पण आता मी त्याच्यासाठी नक्कीच थांबणार नव्हतो. सुसाट निघालो. गाव आलं की हळुवार न्यायचो. पहिला घाट लागला तसं आठवलं की त्या हॉटेलचं नाव बघावं, जे मी न बघताच, मागच्यावेळी तिथे जाऊन पोटपूजा केली होती. "समर्थ". आता ते बंद होतं. कदाचित तिथे कुणी राहात नसावेत. घाट पार करताकरता मागच्या भटकंतीत न पाहिलेल्या गोष्टी आता दिसत होत्या. जंगल संपलं. पुढे काही अंतरावरील तो सिंहगडाच्या पायथ्याचा गाव आणि गुलाबी रंगात रंगवलेलं ते मंदिर नजरेत पुन्हा एकदा भरलं. खूप जुनं ओळखीचं ठिकाण दिसावं आणि आनंद व्हावा असंच वाटलं. थांबलो.
अजून सुर्योदयाला उशीर होता. पुन्हा एकदा सगळा परिसर डोळ्यात साठवला. सिंहगडाच्या त्या किनाऱ्याच्या खाली दरीतील ते विरळ निळसर धुकं आणि वर गुलाबी-भगव्या रंगात रंगलेलं ते आकाश, तो झाडांत लपलेला गाव. तो मंदिराचा गुलाबी कळस आणि ओढ्याच्या पात्रावरून हळुवार निघालेली ती बगळ्यांची माळ. सगळंच कसं सुंदर. कॅमेरा अजून बॅगेतून बाहेर आला नव्हता. थंडीमुळे बोटं आखडून गेली होती. हातात कॅमेरा धरता येईल असं वाटेना म्हणून हातावर हात घासून गरम केले. पण बगळ्यांच्या माळेसोबतचा फोटो काढताच आला नाही.
कॅमेरा बाहेर काढला व एक दोन फोटो काढून चेक केलं व पुन्हा सेटिंग्स बदलले. फोन वाजला. आशू होता, म्हणाला की गाडीत पेट्रोल भरायला थांबला होता. त्याला माझं व्हाट्सअप वरून लोकेशन कळवलं. आणि पुन्हा फोटो काढायला सुरु केलं. सूर्य कुठे उगवणार याची कल्पना आली. कॅमेराचं सेटिंग्ज योग्य करून सूर्याचं स्वागत करायला तयार झालो. पुन्हा आशूचा फोन आला. त्याला नेमकं कोणत्या रोडने यायचं कळत नव्हतं. रस्त्याच्या मधे झाड आहे का त्यानं विचारलं. म्हटलं त्याच रोड ने पुढे ये मी रस्त्यावरच उभा आहे. आणि खरंच रस्त्याच्या कडेला उभं राहूनच फोटो काढत होतो. कॅमेरा बाहेर आल्यापासून एकही बगळा तिथून गेला नाही. सूर्याची सोनेरी कडा दिसू लागली आणि क्षणाक्षणाला तो वर वर येऊ लागला.
आशू आलाच होता. तो सुद्धा सूर्योदयाचे फोटो काढण्यात मग्न झालेला. आम्ही त्या पंधरा वीस मिनिटात वीस शब्द देखील बोललो नाही. कॅमराचं शटर दमल्यावर आम्ही त्या टेकडीवर चढाई केली आणि पक्षी शोधायला लागलो. पण काहीच सापडलं नाही तसं आम्ही पुढे निघालो. पण लगेचच थांबलो पण. एका झाडावर काही कबुतर येऊन बसले. जवळ गेल्यावर आम्ही एकसुरात ओरडलो...सत्याSSS... कारणच तसं होतं. सत्या ज्या कबुतरांच्या मागे तीन वर्षांपासून लागला होता ते पिवळ्या पायांच्या हिरव्या कबुतरांचा (Yellow Footed Green Pigeon) थवाच आमच्या समोर होता आणि सत्याने आजची ट्रिप चुकवली.
Indian Roller म्हणजे चास किंवा निळकंठ पक्षी. हा थोडाफार किंगफिशर सारखा रंगीबेरंगी दिसतो. एक दोन फोटो काढले. तो लांबच होता म्हणून जवळ जाण्याचा प्रयत्न करत होतो पण त्याआधीच तो कुठेतरी निघून गेला. फार काही चांगला फोटो काढता आला नाही पण समाधान वाटलं.
आम्ही तिथेच अजून एका पक्षाच्या मागे लागलो. तो तिथेच इकडे तिकडे फिरत होता. आम्हालाही पळवत होता. पण तो त्या जागेच्या फार लांबही जात नव्हता. त्याला कॅमेरा बंद करताना माझं लक्ष आशुकडे गेलं. तो गाडीवरून उतरून तसंच हेल्मेट घालून फोटो काढत होता. त्याचा त्या अवतारात फोटो काढणं मला जरा गंमतशीर वाटलं. ऐसे पोज में एक तो फोटो बनता है यार!
आम्ही पुढे निघालो. मागच्यावेळी याच ठिकाणाहून परत गेलो होतो. पुढे घाट होता आणि त्याच्यापलीकडे पाबे आणि वेल्हे गावं होती. रस्त्याच्या कडेला एक छोटी टपरी दिसली. किमान चहा मिळतो का बघावं म्हणून आम्ही थांबलो आणि मस्त कांदाभजी खाऊन तृप्त होऊन बाहेर पडलो. आशू स्वस्थ बसलाच नव्हता. त्याचं इकडे तिकडे पक्षी शोधण्यात जास्त लक्ष. अरे तो बघ! आणि हा! असं म्हणत त्याने मला चारपाच पक्षी दाखवले. नावं सुद्धा. पण माझ्या लक्षात राहणं तसं कठीणच. त्या पक्षांचे रंग बघताना मात्र हरकून जात होतो. किती विविधता आहे त्यांच्यात. पूर्वी सगळ्याच चिमण्या बगळ्यांसारखे दिसणारे ते पक्षी आता नवनवीन रूप घेऊन येतायत असं वाटत होतं. एखाद्या पक्षाचं नाव माहिती नसलं की पुस्तकात त्याचं नाव शोधणं आणि तसाच अगदी दिसला तर नेमका कोणता हे सुद्धा शोधणं. नर कोणता आणि मादी कोणती? काय फरक असतात? अरे बापरे! हे तर माझ्या नक्की डोक्यावरून जातं पण इंटरेस्टिंग आहे सगळं. लँडस्केप फोटोग्राफी करताकरता या बर्ड फोटोग्राफीकडे मी हळूहळू ओढला जातोय ते सत्या, आशू, विरेश, योगेश आणि पंकज मुळे. नावं लक्षात ठेवलंच पाहिजे असं नाही. पुस्तकं मदतीला असतीलच. त्यातून काही वेगळे पक्षी दिसले तर? अजून तरी तसं माझ्याबाबतीत काही घडलेलं नाही.
तो बऱ्यापैकी मोठा असणारा पाबे घाट चढून डोंगराच्या वर आलो. डोंगराच्या माथ्यावर असणाऱ्या रस्त्याकडेच्या एका टपरीच्या बाजूला गाड्या उभ्या करून डोळ्याचं पारणं फिटवणारी निसर्गाची किमया डोळ्यात साठवून घेण्याचा दुबळा प्रयत्न सुरु केला. त्या डोंगराच्या एकाबाजूला दूरवर पहुडलेला सिंहगड आणि दुसऱ्याबाजूला तोरणा आणि राजगड आम्हाला साद घालतायत असंच वाटत होतं. चहाची चव चाखताचाखता निसर्ग न्याहाळणं माझ्यासाठी नवीन होतं. चहा संपला तरी तो परिसर काही डोळ्यात मावत नाही. ते काही क्षण मी कॅमेराला विसरून गेलो. स्वच्छ आणि ताजी हवा आत भरून घेताना असं वाटलं की थोडीफार बॅगेत भरून घ्यावी आणि घरी घेऊन जावी. मोकळं आकाश, ते उंच डोंगर, दुपारचं ऊन असून सुद्धा ते दिसणारं खोऱ्यातील निळसर धुकं, न बोचणारं ऊन, गावातली दिसणारी कौलारू घरं, काही ठिकाणची गर्द झाडी, काही हिरवीगार शेतं आणि डोंगरांवरील पिवळं धमक रान. निसर्ग म्हणजे मोठा चित्रकारच आहे. या गोष्टी घडवताना त्याने किती मेहनत घेतली असेल कोण जाणे. आपण मात्र त्याची विल्हेवाट लावत चाललोय याची कुठेतरी खंत वाटते.
आम्ही चहाचे पैसे देऊन त्या डोंगरावरील आणखी उंच माथ्यावर असणाऱ्या झाडाकडे कूच केली. जाताना एका उंबराच्या झाडाखाली शंभू महादेवाचं छोटं मंदिर नजरेस पडलं. छोटा दिवा मिनमिनत होता. नुकतीच त्याची पूजा त्या टपरीच्या मालकाने केली असावी. फोटो काढण्यासाठी आजूबाजूची प्लास्टिकच्या पिशव्या पाकिटं गोळा करून एका बाजूला ठेवली. देवपूजा करायला इथे खालच्या गावातली लोकं येतात. मंदिर साफ करतात पण पूजेचं साहित्य मात्र इथेच आजूबाजूला टाकून जातात. कुणाला काहीही सांगण्याची मनःस्थिती माझी नाहीच. भिडस्त स्वभाव नडतो.
आम्ही तो डोंगर चढत होतो. डोंगराच्या कड्यावरून एकदा तरी जावं असं वाटणारा मी खरंच एक स्वप्न पूर्ण करत होतो. दोन्ही बाजूला दरी. दरीत दोन्ही बाजूला गर्द झाडी जशी की त्या कड्याला आधारच देत आहेत. कमरेपर्यंत वाढलेलं आणि सुकलेलं गवताचं रान. पायवाट तयार करण्यासाठी खणलेल्या चरीतून आम्ही वाट काढत पुढे सरकत होतो. असं रानावनात भटकण्याची हौस अशीच कधीतरी पूर्ण होते तेंव्हा ती अनुभवावीच. वेळ काढून जायला हवं. निसर्गाचं देणं आपण लागतोच. ते शंभर टक्के परत फेड करता येणं आपल्याला शक्य नाही पण नक्कीच आपला काही वेळ तरी निसर्गाबरोबर घालवायला हवा. म्हणजे त्याची किंमत तरी आपल्याला कळेल.
त्या उंच माथ्यावरील झाडाजवळ पोचलो. घामाघूम झालो होतो. छातीची जोरदार धडधड सुरु होती. पण त्या स्वच्छ हवेमुळे त्रास नक्कीच होत नव्हता. आपण सर्वात उंच ठिकाणी पोचलोय असंच वाटत होतं. तिन्ही गड इथून दिसतायत.
आम्ही खाली उतरून त्या टपरीवर परतलो. आणि आधी ताक मग झुणका भाकर कांदा, असा गरमागरम मेनुवर ताव मारला.
तिथेच थोडावेळ सावलीला गप्पा मारत कॅमेरातील फोटोवर नजर मारत बसलो. जमिनीवर टाकलेल्या ब्लँकेटवर आम्ही असे आडवेतिडवे बसलेलो बघून येणारे जाणारे आमच्याकडे बघत जात होते. एका गाडीतून दोन सत्तर पंचाहत्तरीतील काका आले आणि आमच्या शेजारील बाकावर बसले. मी थोडा बाजूला झालो आणि त्यांना बसायला जागा करून दिली. पण त्यांनी नम्रपणे सांगितलं की खाली बसता येत नाही. मग आमची विचारपूस केली गेली. आम्ही काढलेले फोटो दाखवले. ते दोघेच या वयात फिरायला बाहेर पडतात. म्हणाले, पुण्यात राहतो म्हणून आजूबाजूच्या परिसराची ओळख व्हावी म्हणून फिरतायत. पण मला ते फारसं पटलं नाही. कदाचित असेल ही खरं. त्यांना त्यांच्या तरुणपणात काही कारणांनी फिरता नसेल आलं म्हणून आता हौस भागवून घेत असतील. ते दोघे निघाले तसं आम्हीही त्या दोघांचा आणि त्या रम्य परिसराचा निरोप घेतला व परतीचा मार्ग पकडला.
परतताना हळूहळूच गाडी चालवत होतो. न जाणो आणखी काही पक्षी बघायला मिळतील! उतरताना सिंहगडाकडे लक्ष गेलं.
पुन्हा त्याच टेकडीजवळ पोचलो आणि आशूने थांबवलं. म्हणाला त्या टेकडीवर काहीतरी उतरताना त्याने पाहिलं. त्या टेकडीच्या माथ्यावर गेलो पण माळरानाशिवाय काहीच नव्हतं. उन्हं उतरतीला लागलेली. त्यांनी पिवळट रंग परिधान केलेला. दूरवरील झाडातून त्यांचा धुक्यांबरोबर लापाछपीचा खेळ रंगात आलेला. उंच वाढलेल्या त्या सोनेरी गवतातून आशू रोमँटिक मूड मधे फिरत होता.
हा आशू, आशुतोष विचोरे, उंच वाढलेल्या आणि सोनेरी रंगात रंगलेल्या गवतात बसून फोटो काढणं चाललेलं. थोडं माझ्याकडे बघून त्याला पोज द्यायला लावली.

No comments:
Post a Comment