आज थोडा उशीराच उठलो. काल तर कहरच झाला. काल मी चक्क कधी नाही तो दुपारी तीन वाजता उठलो. अगदी कुठेही बाहेर जायचा कंटाळा आला होता. पण पोटपूजा करणं भाग होतं. आज सकाळी लवकर उठायचं ठरवलं पण उशीरा झोपलो आणि उशिरा उठलो. तरी सगळं आवरायला साडे अकरा वाजले. मग काय खाणं पिणं! झोपलो तर नक्कीच नाही. आधी सगळं घर साफ केलं. मग कॅमेराचा सेन्सर साफ करत बसलो. दोन आठवडे कुठेच बाहेर फिरायला गेलो नव्हतो. मागचा शनिवार रविवारी तर जाम सर्दीमुळे घरात झोपून काढला होता. आणि कालचा शनिवार पण झोपून गेला होताच. घर आणि ऑफिस करून जाम कंटाळा पण आला होता. पण बाहेर जायची इच्छा होत नव्हती. दुपारी मस्त भटकंती चा एक ब्लॉग वाचला आणि स्वतः ला म्हणालो अरे हट, असा आळश्यावाणी वेळ घालवलास तर कसं होणार? झालं! डोळ्यावर येऊ पाहणारी झापड एकदम गायब. उठलो आणि पटकन आवरून घरातून बाहेर पडायचं ठरवलं! पण जाणार कुठे? विचार करता करता कसा तास भर गेला कळालंच नाही. चारला एक गोष्ट पक्की झालीच. पाबे घाटात सूर्यास्त टिपायचा!
कॅमेरा बॅगेत टाकला. पाण्याची बाटली बॅगेत टाकली आणि तडक निघालो. कालनिर्णयच्या कॅलेंडर मध्ये सूर्यास्ताची वेळ बघितली. सहा वाजून सोळा मिनिटे. वेळ भरपूर होता पण अर्धा तास आधी पोचणं आवश्यक होतं. नेहमीच्या ठिकाणी चहा घेऊन बाहेर पडता पडता चार वीस झाले. मग थोड्या वेगाने जायला लागलो पण कसचं काय? आधी लहान रस्त्यावर गाड्या हळुवार चाललेल्या. सिंहगडाची ट्रिप संपवून बऱ्याच गाड्या परतीच्या मार्गाला लागलेल्या म्हणून सिंहगडाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा वेग अतिशय कमी झाला होता. मग पेट्रोल भरणं आवश्यक होतं. शुक्रवारी न भरल्याचा परिणाम. सिंहगड-पानशेत रस्ता सोडून जसा पाबे रस्त्याला लागलो तसा वेग अजून कमीच झाला. एक तर वळणावळणाचा घाट रस्ता. त्यात उलट दिशेने येणाऱ्या आणि उताराला लागलेल्या वेगवान गाड्यांना चुकवतच चाललेलो. रस्ता किती खराब आहे याची जाणीव आज झाली. मागच्या दोन्ही ट्रिपच्या वेळी माझं रोड पेक्षा आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात गेलेला. पण आज मला पाबे घाट चढून वर जायचं होतं. आजचा सूर्यास्त तेथूनच टिपायचा होता. आणि म्हणून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष देण्यापेक्षा लवकर पोचणं गरजेचं होतं. गाडीचा वेग वाढवला की गाडी टनाटना उड्या मारायची. फारतर फार मी २७kmph या वेगाने जात होतो तरी असं वाटत होतं की यार आपण खूप वेगात आहोत. जंगल संपलं. ओळखीचं गाव मागे पडलं. एक दोन वेगवेगळे पक्षी समोरून गेले. संध्याकाळ होत आली होती तशी त्यांची सुद्धा धावपळ सुरु झालेली. पण मला आज त्यांचे फोटो काढायला किंवा लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. पाबे घाटात पोचता पोचता सूर्य त्या डोंगरापलीकडे लपाछपी खेळायला लागला. वाटलं, सूर्यास्त बघायला तरी मिळतो की नाही! घाट रस्ता जरा चांगला आहे पण वळणं अवघड आहेत. गाडीचा वेग कमीच ठेवावा लागतो. समोरून येणाऱ्या गाड्यांना आपली गाडी दिसावी म्हणून लाईट सुरु करून ठेवले. घाट चढताना विचार आला की परतताना कदाचित आपण एकटेच असू. थोडी धास्ती वाटली. पण इतक्या लांबवर येऊन परत जाणं अजिबात पटलं नाही. जे व्हायच ते होवो. पण इथलाच सूर्यास्त बघायचाच. पोचलो एकदाचा त्या पाबे घाट माथ्यावर.
ज्या छोट्या टपरीवर मागच्यावेळी झुणका भाकर खाल्ली होती तिथेच गाडी उभी केली आणि चहाची ऑर्डर दिली. ते दादा चहा तयार करून देतात. चहा कधीही तयार ठेवत नाहीत. चहाचे आधण उकळेपर्यंत थोडा पुढे उताराकडे गेलो आणि सूर्यास्त टिपण्याची जागा शोधून ठेवली. चहाचे भुरके मारता मारता समोर पाबे घाट खिंडीकडे लक्ष गेले.
राजगड आणि त्यामागील भगवा रंग परिधान करू पाहणारं आकाश अतिशय सुंदर दिसत होतं. पहिली फ्रेम तरी फिक्स केली. चहा संपल्यासंपल्या आधी कॅमेरा काढून वेगवेगळ्या अँगलने चार पाच फोटो काढले. छोट्या स्क्रीनवर तर हवे तसे फोटो मिळाल्यासारखे वाटले. पाबेच्या उतार घाट रस्त्यावर चालत गेलो आणि पुढच्याच वळणावर असलेल्या थोड्या मोकळ्या जागेवर उभा राहिलो. सुर्यास्ताचा अंदाज घेतला. अजून अर्धातास तरी बाकी होता. म्हणजे मी ठरलेल्या वेळेत पोचलो होतो. एक सुस्कारा टाकला.
आधी तोरणा गडाच्या बाजूचे फोटो काढले. तसे बरेच काढले. प्रकाश अजून बऱ्यापैकी होता पण धुक्यामुळे त्यात तीव्रता म्हणावी तितकी नव्हती. फोटो शार्प येणार नाहीत याची खात्री होती तरी फोटो काढले. लॅपटॉपवरच कळू शकणार होते. नंतर सूर्य मावळतीच्या बाजूचे तसेच राजगडाचे फोटो काढत होतो. योग्य फ्रेम शोधत होतो. घरातून बाहेर पडतानाच कॅमेराला 18-140mm ची लेन्स लावूनच बाहेर पडलो होतो. उद्दिष्ठ पक्कं होतं. त्यामुळे लेन्स बदलायची गरज नव्हती. 18mm ( फोकल लेन्थ अशी मोजतात ) मध्ये जितका परिसर दिसू शकत होता तितका पुरेसा होताच. पण 140mm ( म्हणजे पूर्ण झूम करून) जेवढं दिसत होतं ती सुद्धा वेगळी फ्रेम दिसत होती.
येणारेजाणारे माझ्याकडे बघत होते. काही ओळख असल्यासारखे हसून मान डोलावून गेले. तर काही बघून न बघितल्यासारखं करून आपल्याच धुंदीत निघून गेले. मी घाट माथ्यावर पोचलो तेंव्हा एक कार उभी होती त्यांनी मला घाट सुरु होताना ओव्हर टेक करून पुढे गेले होते. त्यातील तीन चार जण घाट माथ्यावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात मग्न होते. आणि त्यातील एक जण त्या परिसराची माहिती देत होता. आता ती कार पाबेकडे गेली. जाताना त्या गाडीतील काका माझ्याकडे हसून मान डोलावून म्हणाले," छान, उत्तम". मी त्यांच्याकडे बघून छानसा हसलो आणि तितकाच आनंदी झालो. तोरणा किंवा राजगडाची ट्रिप करून काही तरुण मंडळी पुण्याकडे जाता जाता मी जिथे थांबलो होतो तिथे थोडावेळ थांबून लगेच निघून जात होते. माझं फोटो काढणं सुरूच होतं.
जसजसा सूर्य खाली जात होता तसतसा आकाशाचा रंग सुद्धा बदलत चालला होता. खालच्या दरीत अंधार पडायला सुरु झालेला. काही ठिकाणी दिवेलागणी झालेली.
सूर्याची प्रखरता बरीच कमी झालेली. त्या सोनेरी गोळ्याचा आकार व्यवस्थित दिसू लागलेला. त्या लांबवरच्या डोंगराच्या माथ्यावरील झाडांच्या रांगेत जाऊन बसायची तयारी त्याने केलेली हाती. संपूर्ण भोवतालचा परिसर सोनेरी रंगात झळकत होता आणि जसा सूर्य खाली जात होता तशी ती झळाळी हळूहळू कमी होत चाललेली. त्या डोंगरमाथ्यावर जसा सूर्य जाऊन विसावला तसा मी दोन ठरवलेल्या फ्रेम्स टिपल्या. एक पूर्ण झूम करून आणि दुसरी थोडी झूम करून पण त्यात राजगड सुद्धा दिसेल अशी एक.
न थांबता फोटो काढत होतो. कॅमेराचे सेटिंग पटापट बदलत होतो. काही फोटो चांगला प्रकाश असल्यासारखे तर काहीत आजूबाजूचा परिसर काळा आणि वरील आकाश भगवट तपकिरी रंगात आणि त्यात तो सोनेरी रंगाचा सूर्य. काही झूम न केलेल्या फोटोत अगदी वरचे निळे आकाश सुद्धा दिसत होते. सूर्य पूर्णपणे त्या डोंगराआड जाई पर्यंत माझं फोटो काढणं सुरूच होतं. समाधानी होतो. एकही फोटो कॅमेराच्या स्क्रीनवर बघितला नाही. जे काही असेल ते घरी गेल्यावरच बघायचं ठरवलं. काही चुकलं असेल तर आताच्या समाधानाची चव कमी करायची नव्हती. कॅमेरा तसाच गळ्यात लटकवून गाडीकडे परतलो.
तिथे काही चारपाच मित्रमित्र अशीच रविवारची संध्याकाळ मजेत घालवायला आलेले. कदाचित त्या चहावाल्या दादांकडे जेवणाची ऑर्डर देऊन बिअरचे टीन घेऊन उभे होते. आणि लक्षात आलं की, या ठिकाणी अशीच काही लोकं मजा करायला येतात. यायला काहीच हरकत नाही हो. पण त्यांनी त्यांचं पिणं झाल्यावर ते टीन घरी तर नक्कीच घेऊन गेले नसतील. आणि तिथेच टाकून परिसर आणखी विद्रुप करणार. थोडा विषन्न झालो. मी काही करू शकणार नव्हतोच. किंबुहना, मी त्यांना विनंती करू शकलो असतोही. पण वादाचा प्रसंग ओढवला असता तर काय? मी लक्ष न देता परत आलो. शांतपणे अजून एक चहा घेतला. त्या चहावाल्या दादांच्याबरोबर थोड्या गप्पा झाल्या. तेंव्हा एक कळालं की त्यांची कमाई ही त्या टपरीवरच आहे. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांमुळे थोडी शिल्लक पडेल इतकी कमाई होते. अन्य दिवशी मात्र त्यांची मजुरी तितकी सुटते. एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. शक्यच नाही. बहुदा शेती नसावी. किंवा असली तरी यावर्षी पाऊस फारसा नव्हताच. तसेच यापरिसराला पाणी पुरवठा होईल असं काही धरण किंवा बंधाराही नाही. अजून एक गोष्टीची माहिती झाली की या भागातील गावांकडे एस टी महामंडळाने दुर्लक्ष केलेले आहे. एकही एस टी येत नाही. मग पुणे महानगर परिवहन मंडळाची बस तर शक्यच नाही. गावातील लोकांना स्वतःच्या गाडीची व्यवस्था करावी लागलीये किंवा कधीतरी येणाऱ्या रिक्षांवर अवलंबून राहावं लागतंय. दादांच्या ओळखीेच्या बऱ्याच लोकांचं येणं जाणं सुरु होतं म्हणून फारसं विचारताही आलं नाही.
परतताना घाटात गाडीचा वेग फारच कमी ठेवला. जवळपास अंधारच झाला होता. घाट उतरून खाली येई पर्यंत काळोख झालेला. किरकिर किडयांनी आजूबाजूचा परिसर दणाणून सोडलेला. गावागावात दिवे लागणी झालेली. दुरवर पुसटशी चाहूल दाखवणारा सिंहगड झोपायच्या तयारीत असल्यासारखा दिसला. कालच अमावास्या होती मग आज चंद्रप्रकाश असणं शक्य नव्हतं. त्यात गाडीच्या दोन हेडलाईट पैकी एक बंद पडला. अंधारात रस्त्याचा अंदाज घेतच चाललेलो. तशा थोड्या गाड्यांचं येणं जाणं होतं. त्यामुळे मघाशी वाटलेली धास्ती आता वाटत नव्हती.
थंडी वाढत चाललेली. घरी पोचेपर्यंत साडेआठ नक्की वाजणार होते. घरी जाऊन जेवणासाठी परत बाहेर पडायची अजिबात इच्छा नव्हती. मग वाटेतील त्या समर्थ हॉटेल मधून जेवण पार्सल करून घेतलं. ताज्या भाकऱ्या अंडा रस्सा आणि भात. हॉटेल मालक म्हणाले की इथेच गरम गरम खाऊन घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण जेवल्यावर मला पटकन आडवं व्हायचं होतं. आणि घरी जाऊन शांतपणे जेवणंच योग्य वाटलं. घरी आलो. खरंच साडेआठ वाजले. आधी फोटो लॅपटॉप मधे अपलोड केले आणि सर्व फोटोंवर एक नजर फिरवली. कष्टाचं फळ मिळालेलं दिसलं.
कॅमेरा बॅगेत टाकला. पाण्याची बाटली बॅगेत टाकली आणि तडक निघालो. कालनिर्णयच्या कॅलेंडर मध्ये सूर्यास्ताची वेळ बघितली. सहा वाजून सोळा मिनिटे. वेळ भरपूर होता पण अर्धा तास आधी पोचणं आवश्यक होतं. नेहमीच्या ठिकाणी चहा घेऊन बाहेर पडता पडता चार वीस झाले. मग थोड्या वेगाने जायला लागलो पण कसचं काय? आधी लहान रस्त्यावर गाड्या हळुवार चाललेल्या. सिंहगडाची ट्रिप संपवून बऱ्याच गाड्या परतीच्या मार्गाला लागलेल्या म्हणून सिंहगडाच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांचा वेग अतिशय कमी झाला होता. मग पेट्रोल भरणं आवश्यक होतं. शुक्रवारी न भरल्याचा परिणाम. सिंहगड-पानशेत रस्ता सोडून जसा पाबे रस्त्याला लागलो तसा वेग अजून कमीच झाला. एक तर वळणावळणाचा घाट रस्ता. त्यात उलट दिशेने येणाऱ्या आणि उताराला लागलेल्या वेगवान गाड्यांना चुकवतच चाललेलो. रस्ता किती खराब आहे याची जाणीव आज झाली. मागच्या दोन्ही ट्रिपच्या वेळी माझं रोड पेक्षा आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात गेलेला. पण आज मला पाबे घाट चढून वर जायचं होतं. आजचा सूर्यास्त तेथूनच टिपायचा होता. आणि म्हणून आजूबाजूच्या परिसराकडे लक्ष देण्यापेक्षा लवकर पोचणं गरजेचं होतं. गाडीचा वेग वाढवला की गाडी टनाटना उड्या मारायची. फारतर फार मी २७kmph या वेगाने जात होतो तरी असं वाटत होतं की यार आपण खूप वेगात आहोत. जंगल संपलं. ओळखीचं गाव मागे पडलं. एक दोन वेगवेगळे पक्षी समोरून गेले. संध्याकाळ होत आली होती तशी त्यांची सुद्धा धावपळ सुरु झालेली. पण मला आज त्यांचे फोटो काढायला किंवा लक्ष द्यायलाही वेळ नव्हता. पाबे घाटात पोचता पोचता सूर्य त्या डोंगरापलीकडे लपाछपी खेळायला लागला. वाटलं, सूर्यास्त बघायला तरी मिळतो की नाही! घाट रस्ता जरा चांगला आहे पण वळणं अवघड आहेत. गाडीचा वेग कमीच ठेवावा लागतो. समोरून येणाऱ्या गाड्यांना आपली गाडी दिसावी म्हणून लाईट सुरु करून ठेवले. घाट चढताना विचार आला की परतताना कदाचित आपण एकटेच असू. थोडी धास्ती वाटली. पण इतक्या लांबवर येऊन परत जाणं अजिबात पटलं नाही. जे व्हायच ते होवो. पण इथलाच सूर्यास्त बघायचाच. पोचलो एकदाचा त्या पाबे घाट माथ्यावर.
ज्या छोट्या टपरीवर मागच्यावेळी झुणका भाकर खाल्ली होती तिथेच गाडी उभी केली आणि चहाची ऑर्डर दिली. ते दादा चहा तयार करून देतात. चहा कधीही तयार ठेवत नाहीत. चहाचे आधण उकळेपर्यंत थोडा पुढे उताराकडे गेलो आणि सूर्यास्त टिपण्याची जागा शोधून ठेवली. चहाचे भुरके मारता मारता समोर पाबे घाट खिंडीकडे लक्ष गेले.
आधी तोरणा गडाच्या बाजूचे फोटो काढले. तसे बरेच काढले. प्रकाश अजून बऱ्यापैकी होता पण धुक्यामुळे त्यात तीव्रता म्हणावी तितकी नव्हती. फोटो शार्प येणार नाहीत याची खात्री होती तरी फोटो काढले. लॅपटॉपवरच कळू शकणार होते. नंतर सूर्य मावळतीच्या बाजूचे तसेच राजगडाचे फोटो काढत होतो. योग्य फ्रेम शोधत होतो. घरातून बाहेर पडतानाच कॅमेराला 18-140mm ची लेन्स लावूनच बाहेर पडलो होतो. उद्दिष्ठ पक्कं होतं. त्यामुळे लेन्स बदलायची गरज नव्हती. 18mm ( फोकल लेन्थ अशी मोजतात ) मध्ये जितका परिसर दिसू शकत होता तितका पुरेसा होताच. पण 140mm ( म्हणजे पूर्ण झूम करून) जेवढं दिसत होतं ती सुद्धा वेगळी फ्रेम दिसत होती.
येणारेजाणारे माझ्याकडे बघत होते. काही ओळख असल्यासारखे हसून मान डोलावून गेले. तर काही बघून न बघितल्यासारखं करून आपल्याच धुंदीत निघून गेले. मी घाट माथ्यावर पोचलो तेंव्हा एक कार उभी होती त्यांनी मला घाट सुरु होताना ओव्हर टेक करून पुढे गेले होते. त्यातील तीन चार जण घाट माथ्यावरून आजूबाजूचा परिसर न्याहाळण्यात मग्न होते. आणि त्यातील एक जण त्या परिसराची माहिती देत होता. आता ती कार पाबेकडे गेली. जाताना त्या गाडीतील काका माझ्याकडे हसून मान डोलावून म्हणाले," छान, उत्तम". मी त्यांच्याकडे बघून छानसा हसलो आणि तितकाच आनंदी झालो. तोरणा किंवा राजगडाची ट्रिप करून काही तरुण मंडळी पुण्याकडे जाता जाता मी जिथे थांबलो होतो तिथे थोडावेळ थांबून लगेच निघून जात होते. माझं फोटो काढणं सुरूच होतं.
जसजसा सूर्य खाली जात होता तसतसा आकाशाचा रंग सुद्धा बदलत चालला होता. खालच्या दरीत अंधार पडायला सुरु झालेला. काही ठिकाणी दिवेलागणी झालेली.
तिथे काही चारपाच मित्रमित्र अशीच रविवारची संध्याकाळ मजेत घालवायला आलेले. कदाचित त्या चहावाल्या दादांकडे जेवणाची ऑर्डर देऊन बिअरचे टीन घेऊन उभे होते. आणि लक्षात आलं की, या ठिकाणी अशीच काही लोकं मजा करायला येतात. यायला काहीच हरकत नाही हो. पण त्यांनी त्यांचं पिणं झाल्यावर ते टीन घरी तर नक्कीच घेऊन गेले नसतील. आणि तिथेच टाकून परिसर आणखी विद्रुप करणार. थोडा विषन्न झालो. मी काही करू शकणार नव्हतोच. किंबुहना, मी त्यांना विनंती करू शकलो असतोही. पण वादाचा प्रसंग ओढवला असता तर काय? मी लक्ष न देता परत आलो. शांतपणे अजून एक चहा घेतला. त्या चहावाल्या दादांच्याबरोबर थोड्या गप्पा झाल्या. तेंव्हा एक कळालं की त्यांची कमाई ही त्या टपरीवरच आहे. शनिवारी आणि रविवारी पर्यटकांमुळे थोडी शिल्लक पडेल इतकी कमाई होते. अन्य दिवशी मात्र त्यांची मजुरी तितकी सुटते. एकही दिवस सुट्टी घेत नाहीत. शक्यच नाही. बहुदा शेती नसावी. किंवा असली तरी यावर्षी पाऊस फारसा नव्हताच. तसेच यापरिसराला पाणी पुरवठा होईल असं काही धरण किंवा बंधाराही नाही. अजून एक गोष्टीची माहिती झाली की या भागातील गावांकडे एस टी महामंडळाने दुर्लक्ष केलेले आहे. एकही एस टी येत नाही. मग पुणे महानगर परिवहन मंडळाची बस तर शक्यच नाही. गावातील लोकांना स्वतःच्या गाडीची व्यवस्था करावी लागलीये किंवा कधीतरी येणाऱ्या रिक्षांवर अवलंबून राहावं लागतंय. दादांच्या ओळखीेच्या बऱ्याच लोकांचं येणं जाणं सुरु होतं म्हणून फारसं विचारताही आलं नाही.
परतताना घाटात गाडीचा वेग फारच कमी ठेवला. जवळपास अंधारच झाला होता. घाट उतरून खाली येई पर्यंत काळोख झालेला. किरकिर किडयांनी आजूबाजूचा परिसर दणाणून सोडलेला. गावागावात दिवे लागणी झालेली. दुरवर पुसटशी चाहूल दाखवणारा सिंहगड झोपायच्या तयारीत असल्यासारखा दिसला. कालच अमावास्या होती मग आज चंद्रप्रकाश असणं शक्य नव्हतं. त्यात गाडीच्या दोन हेडलाईट पैकी एक बंद पडला. अंधारात रस्त्याचा अंदाज घेतच चाललेलो. तशा थोड्या गाड्यांचं येणं जाणं होतं. त्यामुळे मघाशी वाटलेली धास्ती आता वाटत नव्हती.
थंडी वाढत चाललेली. घरी पोचेपर्यंत साडेआठ नक्की वाजणार होते. घरी जाऊन जेवणासाठी परत बाहेर पडायची अजिबात इच्छा नव्हती. मग वाटेतील त्या समर्थ हॉटेल मधून जेवण पार्सल करून घेतलं. ताज्या भाकऱ्या अंडा रस्सा आणि भात. हॉटेल मालक म्हणाले की इथेच गरम गरम खाऊन घेतलं असतं तर बरं झालं असतं. पण जेवल्यावर मला पटकन आडवं व्हायचं होतं. आणि घरी जाऊन शांतपणे जेवणंच योग्य वाटलं. घरी आलो. खरंच साडेआठ वाजले. आधी फोटो लॅपटॉप मधे अपलोड केले आणि सर्व फोटोंवर एक नजर फिरवली. कष्टाचं फळ मिळालेलं दिसलं.

Mast. Awesome snaps. The shades of yellow and orange colors appearing marvelous. Keep it up. Shirish
ReplyDeleteThank you Shirish. ☺
Deleteखुप सुंदर......
ReplyDeleteधन्यवाद। ☺
Deleteखुप सुंदर......
ReplyDeleteधन्यवाद. ☺
Deleteसुंदर वर्णन !!
ReplyDelete